बापा माझे ऐक जरा… चाल- लई अवघड हाय गड्या….

Khozmaster
1 Min Read
बापा माझे ऐक जरा…
चाल- लई अवघड हाय गड्या….
नव्हती पाटी तरी
गेलो शाळेला
सांगणारे नव्हते तरी
बसलो अभ्यासाला
कण कण वेचून
मिळविले ज्ञान
दिला मार गुरुजींनी
केला सहन…..
बापा माझे ऐक जरा
वाढविन मान रं..
वाट अवघड आहे जरी
घेईल कष्ट रं..  !! धृ !!
पायी पायी चालत
वाट चाललो
ऊन वार्या पावसात
नाही हटलो
चटणी भाकरी खावून
गेलो शाळेला
शपथ घेतो बाबा
आज मनाला…..
राञ राञ जागून
वाचले पुस्तक
काठोकाठ भरले माझे
तेव्हा मस्तक
बघा आज सोनियाचा
दिन आला
नंबर माझा पहिला
शाळेत आला….
@ आनंदा वारांगणे सर मोलखेडा ता सोयगाव.
0 9 5 0 6 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *