प्रविण चव्हाण
नंदुरबार – (प्रतिनिधी )मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चांगलाच तापला असून आरक्षणासाठी समाज सर्वच ठिकाणी एकत्र येत विविध ठिकाणी उपोषण व आंदोलन केली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खु.येथील गुलाब महारु मराठे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज 25 ऑक्टोबर रोजी उपोषणाला सुरुवात केली आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहिल असा पवित्रा घेतला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला एक महिन्याचा अल्टीमेटम दिला होता.अद्याप राज्य शासनाने ठोस पावले उचलली नसल्याने त्यांनी देखील 25 ऑक्टोंबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.त्याप्रमाणेच नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथे 25 ऑक्टोंबर बुधवार रोजी येथील रहिवासी गुलाब मराठे यांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा घेतला आहे. उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी मराठा समाजातील अनेक जणांनी त्यांना पाठिंबा दर्शविला.
यावेळी मराठा समाजाचे नितीन जगताप, भटू बोराणे, जितेंद्र खांडवे, हरिष हराळ, नवनित शिंदे, कदम, उपसरपंच सागर मराठे व उमर्दे येथील मराठा समाज बांधव उपस्थित होते.
2 Attachments • Scanned by Gmail
Users Today : 22