
अकोट तालुका युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी रोशन चिंचोलकार यांची नियुक्ती….
प्रतिनिधी विशाल गवई
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले काल दि २७ ला अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असतांना अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस अंतर्गत येणाऱ्या अकोट तालुका युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी रोशन चिंचोलकार यांची नियुक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांच्या हस्ते युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रभारी प्रदेश सचिव नितेश वानखडे यांच्या मान्यतेने ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष निनाद मानकर यांनी अकोला काँग्रेस जिल्हा अशोक अमानकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. रोशन चिंचोलकार ये आधी काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनेत काम केलेले असून त्या माध्यमातून अनेक उपक्रमे त्यांनी राबविले आहे,युवकांविषयी आंदोलने ,रुग्ण सेवा व अनेक समाजउपयोगी कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहे.पक्षातल्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग त्यांचा असतो.त्यांचे हे कार्य बघून त्यांची ही नियुक्ती पक्ष श्रेष्ठीनी केली.रोशन चिंचोलकार यांच्या नियुक्ती नेत्यांच्या मित्रमंडळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र शुभेच्छा च वर्षाव त्यांच्या वर होत आहे .त्यांच्या नियुक्तीचे श्रेय त्यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बि व्ही श्रीनिवास,काँग्रेस कमेटीप्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत,काँग्रस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर,प्रदेश सचिव प्रकाश तायडे,जिल्हा उपाध्यक्ष महेश गणगणे,प्रदेश प्रवक्ता डॉ सुधीर ढोने,प्रदेश महासचिव डॉ अभय पाटिल ,कामगार काँग्रेस मा.प्रदेशाध्यक्ष मो.बद्रूजमा,अकोटचे माजीनगराध्यक्ष संजय बोडखे,महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संजीवनी ताई बिहाडे,कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट सभापती प्रशांत पाचडे,युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांना दिले आहे.
Users Today : 13