दादावाडीत उपक्रम,महिलांचा सहभाग*
प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधी)- आचार्य १००८ श्री रामलालजी म.सा यांच्या दिक्षेचा सुवर्ण जयंती निमित्त साधूमार्गी जैन संघाचा वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ९० जणांनी सामाजिक बांधिलकीतून रक्तदान केले.
शहरातील आदेश्र्वर नगर स्थानकात (दादावाडी)साधूमार्गी जैन संघ,समता युवा संघ व समता महिला मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ.रोशन भंडारी, माजी नगरसेवक रवींद्र पवार,विलास रघुवंशी,पारसमल कोठारी,खेतमल कोटडिया,प्रकाश कोचर,चेतन बुरड,नरेंद्र बेदमूथा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात ९० जणांनी सामाजिक बांधिलकीतून रक्तदान केले. शिबिरात महिलांच्या सक्रिय सहभाग दिसून आला. यशस्वीतेसाठी समता युवा संघचेबअध्यक्ष रमेश कोटडिया,मंत्री नीलेश सुराणा,उद्योगपति दिलीप बिनायक्या, नितेश तातेड, महावीर कोटडिया, देवेंद्र कोटडिया, यश वेदमुथा, राजूभाई बैदमुथा,मेहुल कोठारी यांनी परिश्रम घेतले.
*फोटो ओळ*
नंदुरबार: आदेश्वर नगर जैन स्थानकात रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,डॉ. रोशन भंडारी, रवींद्र पवार,विलास रघुवंशी,पारसमल कोठारी,खेतमल कोटडिया,प्रकाश कोचर,चेतन बुरड,नरेंद्र बेदमूथा
Users Today : 13