बचत कशी करावी
गरीबां घरात शिक
आज खाअर्धा घास
ठेव एखादा उदईक
संबंध असावे छान
जमो भली सोयरीक
अंथरुणात हवे पाय
नको मागाया भीक
बॅंकेत पैका सुरक्षीत
नकोउगा झिकझीक
कमी जास्त व्याज ते
मिळते ना वेळी ठीक
दोन घास खावे कमी
शरीर यष्टी ही बारीक
वाळकी भाकर वेळी
भले न मिळो खारीक
सोन्यासारखी माणसे
नकोझगझग माणीक
अर्धेपोटी राहू आपण
द्यावी शेजारी कणीक
मेहनतीचा घाम गाळ
निर्बीड जमीन सुपीक
आज जरी अंधारलेले
रे सूर्य उगवेलं उदईक
– हेमंत मुसरीफ पुणे .730306996..
www.kavyakusum.com
सर नमस्कार
बचत दिन शुभेच्छा 🙏
कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावीं ही विनंती
Users Today : 13