अकोला जिल्ह्यात नेत्यांना गावात प्रवेश बंदीची झाली सुरुवात
मळसुर – गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. परंतु या मुद्द्यावर सरकारकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नेत्यांविरोधात रोष निर्माण झाला असून काही ठिकाणी नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अकोला जिल्ह्यातही या रोषाची सुरुवात झाली असून पातुर तालुक्यातील चरणगाव येथे राजकीय पुढार्यांना गावात प्रवेश बंदीचे फलक शनिवारी लावण्यात आले. गेल्या 1 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटले होते. तिथून मराठा आरक्षणाचे आंदोलन आणखी तीव्र होत गेले. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेऊन एक महिन्याची मुदत मागितली होती. परंतु ही मुदत उलटून गेली तरीही सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज बांधवांमध्ये पुन्हा संताप निर्माण होत आहे. या संतापातून काही ठिकाणी नेत्यांना मराठा समाज बांधवांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे.
शनिवारी अकोला जिल्ह्याच्या पातुर तालुक्यातील चरणगाव येथे सुद्धा राजकीय पुढार्यांना गावात प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले. तसेच राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले अकोला जिल्ह्यात चरणगाव पासून सुरू झालेले नेत्यांना गावबंदीचे लोण जिल्ह्यात इतर गावांमध्येही पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. यापुढे मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे. मोठ्या नेत्यांना ज्याप्रमाणे त्यांच्या मुलांची काळजी आहे, त्याप्रमाणे आम्हालाही आमच्या मुलांची काळजी आहे. त्यांच्या भवितव्याची काळजी आहे. त्यामुळे राजकीय पुढार्यांनी एक तर मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा करावी किंवा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलले तर त्या नेत्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील. अशा संतप्त प्रतिक्रिया या निमित्ताने मराठा समाज बांधवांनी व्यक्त केल्या आहेत.यावेळी राजेश देशमुख सुनील देशमुख चेतन देशमुख अमर देशमुख धनंजय देशमुख श्रीकांत देशमुख निशांत देशमुख गजानन देशमुख सुनील देशमुख शंकरराव देशमुख अनिल देशमुख बाळासाहेब देशमुख नथुराम देशमुख पंजाबराव देशमुख बाबाराव देशमुख केशवराव देशमुख पार्थ देशमुख उमेश देशमुख सुशांत देशमुख अजय देशमुख संतोष देशमुख संतोष टिकार दत्ता देशमुख शैलेश देशमुख उदय देशमुख सुधीर देशमुख गजानन देशमुख गोपाल देशमुख उपस्थित होते
———————————————
आमच्यातल्याच काही मराठा नेत्यांनी आमचा फक्त वापर करून घेतला. त्यांना त्यांच्या मुलांची काळजी आहे. आमच्या मुलांची मात्र कुणालाही काळजी नाही. त्यामुळे आता आम्हाला आमच्या मुलांची काळजी करावी लागेल. तेव्हा अशा नेत्यांनी आता विरोधात बोलू नये. अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील. श्रीकांत देशमुख, चरणगाव
______________________________
आम्ही मराठा आरक्षण संदर्भात गेल्या बरेच दिवसापासून लढा देत मागच्या महिन्यात जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे 29 तारखेला आमरण उपोषण चालू केलेला होता सरकारने त्यांना तीस दिवसाची वेळ मागितली होती पण तरी चाळीस दिवस झाल्यानंतर अजून पर्यंत कुठलाही आरक्षणासंदर्भात जीआर काढलेला नाही आणि कुठलीही निर्णय घेतलेला नाही तर त्या संदर्भात जरांगे पाटलांनी परत तीन दिवसापासून आरक्षण आमरण उपोषण चालू केलेला आहे. आता आरक्षण मिळे पर्यंत आम्ही राजकीय नेत्यांना गावात प्रवेश करू देणार नाही.
राजेश दादाराव देशमुख चरणगाव
Users Today : 13