भूमिका अभिनय स्पर्धेत अनुसुचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा वळती विद्यार्थ्यांचा राज्यस्तरावर तीसरा क्रमांक
बुलडाणा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याची संस्कृती, लोककला यांचे दर्शन घडवणारी गीते, त्यावर विद्यार्थ्यांची नयनरम्य नृत्ये, विविध सामाजिक समस्यांवर सादर करण्यात आलेली भूमिका अभिनय नाट्ये, विद्यार्थ्यांनी रसिकांच्या प्रश्नाला दिलेली दिलखुलास उत्तरे, अशा उत्साही वातावरणात राज्यस्तरीय लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धा पार पडल्या. निमित्त होते लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धेचे लोकसंख्या शिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धा दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे यांच्या वतीने महात्मा फुले सभागृह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
संचालक श्री. अमोल येडगे, सहसंचालक श्री. रमाकांत काठमोरे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनात सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे , डॉ .माधुरी सावरीकर , डॉ.दिपक माळी , विभागप्रमुख सचिन चव्हाण, बसवेश्वर किल्लेदार,प्रिया शिंदे, वर्षाराणी भोपळे, योगेश सोनवणे यांच्यासह परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाले.डॉ.नेहा बेलसरे यांनी सहभागी संघाना शुभेच्छा देऊन, स्पर्धेचे नियम समजावून सांगितले. डॉ.माधुरी सावरीकर यांनी सहभागी विद्यार्थी व सोबत आलेल्या शिक्षकांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. डॉ.दिपक माळी यांनी सहभागी विद्यार्थी व सोबत आलेल्या शिक्षक यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गायकवाड यांनी केले.राज्यातून 16 संघ भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेसाठी सहभागी झाले. 88 विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सादरीकरण केले. 32 शिक्षकांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. सदर स्पर्धेचे संयोजन संचालक श्री. अमोल येडगे, सहसंचालक श्री. रमाकांत काठमोरे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनात सामाजिक शास्त्र विभागातील उपसंचालक डॉ.नेहा बेलसरे ,विभागप्रमुख सचिन चव्हाण, विषय सहाय्यक बाळासाहेब गायकवाड, पदमजा लामरुड यांनी केले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-भूमिका अभिनय स्पर्धा-प्रथम क्रमांक-मिरज हायस्कूल, मिरजता.मिरज जि. सांगली द्वितीय क्रमांक-सोलापूर मनपा प्रशाला क्र 1 कॅम्प द.स.बझार, सोलापूर तृतीय क्रमांक-अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा वळती. जि. बुलडाणा
अनुसुचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा वळती, ता. चिखली, जि. बुलडाणा येथील विद्यार्थ्यांच्या चंमुने विभागीय स्तरावर भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये अंम्ाली पदार्थाचा गैरवापर व त्याची कारणे आणि प्रतिबंध या विषयावर सार्थक बोरकर, अमन साळवे, प्रतीक पानपाटील, वैभव राऊत, अमोल गवई या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय कौशल्याचे सादरीकरण केले. याबद्दल मा. प्रादेशिक उप आयुक्त सुनिलजी वारे साहेब समाज कल्याण अमरावती यांनी वरिल विद्यार्थ्यांचे मनभरुन कौतुक केले. मा.डॉ.अनिता राठोड मॅडम, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बुलडाणा, यांनी भूमिका अभिनय स्पर्धेतील यशाबद्दल विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पुणे येथे या चमुसोबत मुख्याध्यापक शशीकांत जाधव, धनंजय सास्ते उपस्थित होते. त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना अभिनय स्पर्धेमध्ये आपण यशस्वी होऊ असे सांगुन प्रोत्साहित केले होते.
प्रति,
मा. संपादक/ प्रतिनिधी ———————
कृपया वरील शैक्षणिक बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक/ साप्ताहिकातून प्रकाशित करावी, ही नम्र विनंती.
आपला विश्वासु,
( शशिकांत जाधव )
मुख्याध्यापक
Users Today : 13