विजय ढोरे राज्यस्तरीय नटश्रेष्ठ निळू फुले सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित* 

Khozmaster
2 Min Read

 

 

*विजय ढोरे राज्यस्तरीय नटश्रेष्ठ निळू फुले सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित*

प्रतिनिधी विशाल गवई

नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी चा राज्यस्तरीय नटश्रेष्ठ निळू फुले सेवाव्रती पुरस्कार हा विजय ढोरे यांना प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री विजयजी गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान कोषाध्यक्ष विजय ढोरे यांना २३ वर्षाच्या सामाजिक कार्यासाठी हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. सहकारी विश्वस्त मंडळाच्या सहयोगातून विजय ढोरे यांच्या पुढाकाराने पादुका संस्थान द्वारे प्रामुख्याने ६५ गावातील संस्थानच्या २००० पुरुष व महिला सेवाधारी यांच्या मदतीतून त्यांच्या गावात ग्राम स्वच्छता अभियान, तिर्थक्षेत्र स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मरणोत्तर देहदान अभियान, नदी खोलीकरण व रुंदीकरण, मातृत्व शक्ती सन्मान सोहळा, गावाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी आंदोलन, मुंडगावच्या प्राचीन इतिहासाचा शोध,स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अद्यावत ग्रंथालय व इतरहीमाध्यमातून धर्म , आरोग्य, शिक्षण, कृषि, सांस्कृतिक व पर्यावरण संरक्षणावर आधारित नावीन्यपूर्ण उपक्रम सक्रीयपने राबवीले आहेत. विजय ढोरेंना या आधी योगी भुषण, संतनगरी मुंडगाव नागरी सन्मान,कोरोना योद्धा, युवा क्रांती पुरस्काराने करण्यात आले आहे.

नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याला मराठी अभिनेते श्री विजयजी गोखले , विधान परिषद सदस्य, अमोलदादा मिटकरी,श्री रमेशजी थोरात, संस्थापक अध्यक्ष निळूफुले फॉउंडेशन , सुधाकरजी गीते, सचिव निळूफुले फाउंडेशन, नरेश गढेकर, केंद्रीय उपाध्यक्ष अ. भा. नाट्य परीषद, मुंबई व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती होती. ए व्ही थीएटर, विद्याभारती फार्मेसी कॉलेज , अमरावती येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्याला शेकडोंच्या संख्येने विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.

विजय ढोरे या पुरस्काराचे सर्व श्रेय पादुका संस्थान चे विश्वस्त मंडळ, व सल्लागार समिती, व सेवाधारी यांना देतात .

0 9 5 0 6 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *