3 नोव्हेंबर ला बार्शीटकली तालुक्यातील एकूण 57 शाळा मध्ये होणार परीक्षा
प्रतिनिधी बार्शीटाकली
सेस ची राज्य स्तरीय परिक्षा 3 नोव्हेमबर ला होणार असून त्या अंतर्गत तालुक्यातील निरीक्षक शिक्षकांची सभा बार्शीटाकळी पंचायत समिती येथील सभागृह मध्ये पार पाडली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे अधिव्याख्याता अंकुश ससाने बार्शीटाकळी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विनोद पिंपळकर प्रमोद जानोरकर केंद्र प्रमुख शाहिद इक्बाल खान हे होते
येत्या तीन नंबर रोजी तालुक्यातील 57 शाळांमध्ये वर्ग तिसरा सहावा व नवा वर्गाच्या विद्यार्थ्यांची सेस ची परीक्षा संपन्न होणार आहे त्याकरिता निरीक्षक शिक्षकांची मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते
या वेळी उपस्थित शिक्षकांना सेस परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमात परीक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले या वेळी बार्शीटाकळी पंचायत समिती मधील सर्व साधन व्यक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन किशोर जाधव यांनी केले या वेळी कार्यक्रम यशस्वीते साठी गणेश राठोड किशोर जाधव यांनी परिश्रम घेतले या वेळी सर्व शिक्षकांची उपस्थिती होती
Users Today : 13