*नि:शुल्क १४ वी भव्य राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-*
*नक्षञाचं देणं काव्यमंचचा अनोख्या उपक्रमाचे दरवर्षीप्रमाणे आयोजन-*
नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,पुणे वतीने दरवर्षी दर्जेदार भव्य दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.या वर्षी प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकानी या स्पर्धेत सहभाग घ्यावा.हि स्पर्धा मोठी मानाची,सन्मानाची असते.संपूर्ण महाराष्टातून या स्पर्धेला दिवाळी अंक येत असतात.स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळत असतो.चुरसीची ही दिवाळी अंक स्पर्धा असते.
नि:शुल्क १४ व्या भव्य राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेसाठी २०२३ मध्ये प्रकाशित दिवाळी अंकानी यात सहभाग घेण्याचे आवाहान करण्यात येत आहे.संपादकांनी आपल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती नक्षञाचं देणं काव्यमंचच्या कार्यालयात जानेवारी अखेर पर्यंत पाठविण्याचे आवाहान करण्यात आले आहे.
प्रत्येक सहभागी दिवाळी अंकाला सहभागाबद्दल आकर्षक फोरकलर सन्मानपञ,गुलाबपुष्प देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते.विजेत्या दिवाळी अंकाला गौरवचिन्ह,सन्मानपञ,शाल
,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन भव्य समारंभापूर्वक गौरविण्यात येते.
मायमराठीची व साहित्याची सेवा दिवाळी अंकाच्या माध्यमातून होत असते.त्याचा गौरव होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.भविष्यातील अनेक साहित्यिक,कवी,लेखक घडविण्याचे काम दिवाळी अंक करत आहेत.अनेक वर्षांची मोठी परंपरा दिवाळी अंकाची आहे.
*दिवाळी अंक पाठविण्याचा पत्ता-*
*प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे*
*अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच*
*साई सदन,ए/३,महालक्ष्मी हाईटस,भोसरी,पुणे-४११०३९*मोबा. ९६५७३४८६२२*
असे आवाहान अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी संपादकांना केले आहे.
Users Today : 13