मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे’, चिठ्ठी लिहिली अन् मराठा तरुणाने आयुष्य संपवलं

Khozmaster
2 Min Read

गजानन पवार, हिंगोली: राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहे. मराठा समाजातर्फे राजकीय नेत्यांना गावबंदीदेखील करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मराठा आरक्षणाचा तिढा न सुटल्याने मराठा युवक टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शेवाळा शिवारात घडली आहे. मराठा समाजातील युवकाने चिठ्ठी लिहून झाडाला गळफास लावून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.

या बद्दल सविस्तर माहिती अशी की,शेवाळा शिवारात आज २६ गुरुवार रोजी युवक नवनाथ उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय २३) या युवकाने आत्महत्या केली असून या युवकाने मरण्यापूर्वी आपल्याकडे ” मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे” अशी चिठ्ठी लिहून ठेवल्याने मोठी खळबळ उडाली आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ हा देवजणा येथील रहिवासी असून सध्या सोयाबीन कापणी व काढणीचे दिवस सुरू असल्याने नवनाथ कल्याणकर हा ट्रॅक्टरवर काम करत होता. सकाळ पासून तो परिसरातील शेवाळा शिवारात काम करण्यासाठी गेला होता. शेतशिवारात मळणी यंत्र सुरू करुन एका शेतात बाजूला असलेल्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे.

चालू आसलेल्या मळणी यंत्रामध्ये जास्त प्रमाणात सोयाबीनचा घास अडकल्याने ट्रॅक्टर बंद पडत होते तेव्हा मजूरांनी त्यांना आवाज दिला. मात्र आवाज दिल्यानंतरही नवनाथ कल्याणकर आढळून येत नसल्याने मजूरांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नवनाथचा शोध घेतला असता एका झाडाला गळफास लावला असल्याच आढळून आले.

लागलीच या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार उपनिरीक्षक शिवाजी बोंडले आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची तपासणी केली असता मयत नवनाथ यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. यावर मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे अशी माहिती लिहिलेली असल्याचे मिळून आले आहे.मयत नवनाथ हा मराठा आरक्षणात सक्रिय सहभाग घेत असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस करीत आहेत.

0 9 5 0 6 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *