मराठवाड्यात अंगावर वीज पडून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं अख्खा गाव हळहळला

Khozmaster
1 Min Read

परभणी : गंगाखेड (जि. परभणी) तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि भेंडेवाडी येथे वेगवेगळ्या दोन घटनांत वीज पडून तीन ठार, तर तीन जखमी झाल्याची घटना घडली. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी ही माहिती दिली आहे.गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता शेतात काम करत असताना माय-लेकीचा मृत्यू झाला. डोंगरपिंपळा येथे शेतात काम करताना वीज पडून सविता विठ्ठल कतारे (४०) आणि त्यांची मुलगी निकिता विठ्ठल कतारे (१८) यांचा मृत्यू झाला. तालुक्यातीलच भांडेवाडी येथे ओंकार किशन घुगे या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. त्याचा चुलता गोविंद विनायक घुगे (३०) हे जखमी झाले. सुनीता काशिनाथ शेप (४८) आणि रेणुका काशिनाथ शेप (२७) या मायलेकी जखमी झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली.बीड : जिल्ह्यातील सोनीमोहा (ता. धारूर) येथे शुक्रवारी वीज पडून महिला मृत्युमुखी पडली. संगीता मच्छिंद्र कराड (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. भोपा येथे गोरख मारोती डापकर यांच्या बैलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.बीड : जिल्ह्यातील सोनीमोहा (ता. धारूर) येथे शुक्रवारी वीज पडून महिला मृत्युमुखी पडली. संगीता मच्छिंद्र कराड (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. भोपा येथे गोरख मारोती डापकर यांच्या बैलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

0 9 5 0 6 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *