अनैतिक संबंधातून झाला खून : आरोपीला पोलिसानी केले जेरबंद

Khozmaster
1 Min Read
लोणार :

      अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या युवकाचा गळा दाबून खून केल्याची घटना 29 ऑक्टोबरला तालुक्यातील पळसखेड येथे उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपीला पोलीसांनी गजाआड केले असून आरोपी विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, लोणार तालुक्यातील पळसखेड येथील ३० वर्षीय राजाराम गजानन जायभाये 28 ऑक्टोबरला आरोपीच्या शेतात नांगरणीसाठी गेला होता. दरम्यान त्याचे प्रेत 29 ऑक्टोबरला आरोपीच्या शेतात आढळून आले होते. आरोपी संतोष मदन थोरावे वय ३४ व राजाराम जायभाये यांचे मिञत्वाचे सबंध होते. यातूनच आरोपी व मयताची पत्नी यांच्यात अनैतिक सबंध जूळले. मात्र त्यांच्या संबंधात मृतक अडसर ठरत असल्याने आरोपीने त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याबाबत मृतकाचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी आरोपी संतोष मदन थोरवे वय ३४ रा.पळसखेड याच्या विरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला गजाआड केले. दरम्यान उपविभागीय पोलीस अधीकारी प्रदीप पाटील यांनी घटनेचा आढावा घेऊन सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय राजाराम घोगरे हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपीला पिएसआय युवराज रबडे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शेळके , विशाल धोंडगे , गणेश लोढे ,संजय जाधव , नितीन खराडे ,भाऊसाहेब मोरे, संतोष चव्हाण यांनी शिताफीने अटक केली.
0 9 5 0 7 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *