विजया महिला मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पारितोषिक वितरण..

Khozmaster
1 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील वाघेश्वरी नगर भागातील विजया महिला मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांमध्ये सहभागी महिला तसेच विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
शहरातील विजया महिला मंडळ आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
    वाघेश्वरी नगर परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त गरबा,दांडिया नृत्य तसेच संगीत खुर्ची आणि समाज प्रबोधनपर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
     या विविध स्पर्धांमध्ये परिसरातील महिला, युवती तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.विजया  महिला मंडळाचे अध्यक्ष बी.डी.गोसावी, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे अध्यक्ष महादू हिरणवाळे,  जी.टी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र रघुवंशी,डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलच्या उपशिक्षिका रेखा गोसावी यांच्या हस्ते स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाघेश्वरी नवरात्र मंडळाच्या  मीनल  रघुवंशी, राजश्री जाधव, सुवर्णा चौधरी,  रजनी रघुवंशी, गायत्री बोरदे, सोनाली बडगुजर, हेमलता  राजपूत, पुनम खैरनार.  ओम चौधरी, ओम पाटील, भूषण,  सोनार, सोहम, हेमंत सोनार, वेदांत चौधरी, पार्थ  जाधव यांनी परिश्रम घेतले.  रेखा गोसावी, बी.डी.गोसावी, नितीन पाटील,महादू हिरणवाळे, यांनी संयोजन केले.
 
फोटो कॅप्शन – नंदुरबार शहरातील वाघेश्वरी नगर भागातील विजया महिला  मंडळातर्फे विविध  स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थित बी.डी. गोसावी, रेखा गोसावी, महादू हिरणवाळे, प्राचार्य महेंद्र रघुवंशी,नितिन पाटील आदी
0 9 5 0 7 0
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *