दिनांक:-30-10-2023
प्रतिनिधी:- शिवाजी उदार
मेरा खुर्द:- येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे ए टी एम मागील पंधरा ते वीस दिवसापासून शोभेची वस्तू बनले आहे.कारण हे ए टी एम मागील पंधरा ते वीस दिवसापासून बंद अवस्थेत पडलेले आहे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांची गैरसोय होत आहे.मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेला भरपूर खेडे जोडलेले आहे.त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी मेरा खुर्द येथून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेले चिखली, साखरखेर्डा, देऊळगाव मही या ठिकाणी जावे लागत आहे. कामाच्या व सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून ए टी एम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी होत आहे.
Users Today : 18