सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अपघात विमा नजीकच्या पोस्ट आफिस मधे ३९९ रुपयांचा वार्षिक हप्ता काढून घ्यावे असे आवाहन पोस्ट मास्तर मधूकर पुजारी यांनी केले आहे.अशीच एक घटना नुकतीच अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे तर मयतच्या वारसांना अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सावेडी येथील शिक्षकाच्या कुटुंबीयांना पोस्टाच्या ३९९ च्या अपघात विमा योजनेची तब्बल १० लाख रुपये भरपाई अपघात विमा मिळाला आहे.
काय आहे अपघात विमा पॉलिसी १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तीसाठी वार्षिक हप्ता फक्त ३९९ (टाटा ए आय जी) व रू.
३९६ (बजाज इन्शुरन्स)अपघाती निधन झाल्यानंतर वारसास १० लाख रुपये.अपघातामुळे कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास १० लाख रुपये.अपघातामुळे अंशतः अपंगत्व आल्यास १० लाख रुपये.अपघातामुळे येणारा वैद्यकीय खर्च ६० हजारपर्यंत.
याशिवाय अपघातामुळे निधन झाल्यास अंत्यविधी खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, प्रवास खर्च यांचा देखील समावेश आहे.
कागदपत्रांची आवश्यकता नाहीसोयगाव तालुक्यात कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ही विमा पॉलिसी घेता येईल. सर्व पोस्टमन यांना मोबाइल फोन वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत. पोस्टमन आपल्या मोबाइलवरून पॉलिसी काढून देतात. यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. फक्त आधार क्रमांक, मोबाइल व ई-मेल आयडीची गरज आहे.तालुक्यात व सावळदबारा परिसरात सर्वांनी ३९९ रुपयाचा टाटा ए आय जी ३९६ रुपयांचा विमा नजीकच्या पोस्ट आफिस मधे काढून घ्यावे असे आवाहन मधूकर पुजारी पोस्ट मास्तर सावळदबारा यांनी केले आहे.
Users Today : 17