Maratha Reservation! …तर नेत्यांनी मराठा नाही म्हणून जाहीर करावं; आरक्षणासाठी शेतकरी महिला संताप

Khozmaster
1 Min Read

 सोलापूर : राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीने राज्याच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा आरक्षण मिळालं तर ग्रामीण भागातील मराठा शेतकऱ्यांना, त्यांच्या लेकरांना किंवा पुढच्या पिढीला मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रिया शेतकरी महिलांनी दिली आहे. मराठा समाजाच्या मंत्र्यांना, आमदारांना व खासदारांना मराठा आरक्षणाची लाज वाटत असेल तर त्यांनी जाहीर करावं, आम्ही मराठे नाहीत. शहरी भागातील मराठा समाज जागृत आहे. मात्र, ग्रामीण भागातील मराठा समाजाला आजही अनेक समस्याना तोंड द्यावं लागतं आहे, असाही संताप मराठा समाजातील महिलांनी व्यक्त केला.मराठा समाजातील श्रीमंत हे श्रीमंत होत चालले आहेत तर गरीब हे गरिब होत चालले आहेत, अशी प्रतिक्रिया उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील ग्रामस्थांनी व शेतकरी महिलांनी दिली आहे.

कोंडी गावातील मराठा बांधव ३७ दिवसांपासून साखळी उपोषणासाठी सज्ज…

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील मराठा बांधव हे गावच्या वेशीवर गेल्या ३७ दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. सोमनाथ राऊत व प्रकाश भोसले यांनी गेल्या ३ दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. गावातील लोकसंख्या पहिली असता, जवळपास सर्वच लोकसंख्या ही मराठा समाजाची आहे.

0 9 5 0 6 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *