
सहाय्यक अभियंता महावितरण चौहटा बाजार यांना प्रहारच्यावतीने निवेदन
प्रतिनिधी विशाल गवई अकोला
चौहटा बाजार येथील कृषी पंप विद्युत पुरवठा दुरुस्ती करून सुरळीत चालू करण्यासाठी सहाय्यक अभियंता महावितरण चौहटा बाजार यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे शेतकरी आघाडीचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात असे म्हटले आहे की चौहटा बाजार परिसरात व अकोट तालुक्यामध्ये पाऊस न आल्यामुळे शेतकरी सध्या हवालदील झाला आहे पाऊस कमी झाल्यामुळे पिके हे सुकत आहेत व आता कृषी पंपाचा वापर करून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे लवकरात लवकर विद्युत पुरवठा दुरुस्त करून व सुरळीत चालू करून देण्यात यावा व शेतकऱ्यांच्या पिकांना जीवनदान मिळेल अशा याचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांनी महावितरण ला देण्यात आले यावेळी शेतकरी बांधव व प्रहार चे कार्यकर्ते उपस्थित होते
Users Today : 17