जळगाव: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातही मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. चिंचोली ग्रामस्थांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी या गावामध्ये मंत्री तसेच सर्वपक्षीय राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्यात आली असून त्याबाबतचा फलक लावण्यात आला आहे. मराठा समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन मंत्र्यांसह सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चिंचोली गावात एकही मंत्री तसेच पुढाऱ्याला प्रवेश दिला जाणार नाही. आणि जर कुठल्याही मंत्री अथवा राजकीय पुढाऱ्याने गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या गाड्या फोडल्या जातील असा आक्रमक इशाराही यावेळी मराठा समाज बांधवांनी दिला आहे.
Users Today : 14