जळगाव : चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे येथे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या करत जीवन संपविल्याची घटना सोमवारी उघड झाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शीतल बापु पाटील (वय ३५, रा. बहुर ता. चाळीसगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बहुर गावात पाटील कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेती होती. त्यावरच घराचा प्रपंच सुरू आहे. शेतीला जोडधंदा व्हावा, म्हणून शीतल यांचे पती बापू पाटील यांनी एका फायनान्स कंपनीकडून साडेचार लाखांचे कर्ज काढून मालवाहू वाहन घेतले. त्यात बचत गटाचे देखील चार लाखांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडणार याची शीतल यांना सतत चिंता लागलेली होती. मी सर्व कर्ज फेडून टाकेन, तु चिंता करू नको असा धीर देत शीतल यांचे पती नेहमी समजूत काढत होते.
Users Today : 14