दलाई लामांच्या उपस्थितीत जानेवारीत जागतिक धम्म परिषद

Khozmaster
2 Min Read
दलाई लामांच्या उपस्थितीत जानेवारीत जागतिक धम्म परिषद (फोटो सतीश पवार…)

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बसफेऱ्या रद्द : नोव्हेंबरमधील आयोजन पुढे ढककले
बुलढाणा, दि. ३१ (प्रतिनिधी)
………………………………..
येथे ४ व ५ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेली जागतिक धम्म परिषद व बिझिनेस एक्स्पो सद्यस्थितीत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणारी आंदोलने, रद्द होणाऱ्या बसफेऱ्या तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे पुढे ढकलला आहे. आता १ व २ जानेवारी २०२४ रोजी धम्म परिषद व एक्स्पो घेण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सतीश पवार यांनी नमूद केल्यानुसार, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय परिस्थिती संवेदनशील झाली आहे. त्यातच बहुतांश ठिकाणी आक्रमक आंदोलने होत आहेत. शिवाय एसटी महामंडळाने तोडफोडीच्या भीतीने लांबपल्ल्याच्या अनेक बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. बसेसअभावी देशभरातून धम्मबांधवांना बुलढाणा येथे येण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने बुलढाणा येथे ४ व ५ नोव्हेंबर रोजी आयोजित धम्म परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धम्म परिषद व बिझिनेस एक्स्पो दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. त्या दृष्टीने समाजबांधवांनी तयारी चालविली होती. अवघ्या काही दिवसांवर आलेली धम्म परिषद आता नोव्हेंबरऐवजी १ व २ जानेवारी २०२४ रोजी घेतली जाणार असल्याचे सतीश पवार यांनी म्हटले आहे. जानेवारीमध्ये आयोजित धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांच्या वतीने तयारी केली जात असल्याचेही पवार यांनी सांगितले.

0 9 5 0 6 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *