मुलगा काम सोडून घरीच; आईचा नोकरीसाठी वारंवार तगादा, तरुण संतापला अन् नको ते करुन बसला, काय घडलं?

Khozmaster
2 Min Read

नवी मुंबई: वाशी येथील कोपरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या आईचा मुलानेच गळा दाबून हत्या केली आहे. एका तरुणाने कामधंदा करण्यासाठी तगादा लावणाऱ्या आपल्या आईची गमजाने गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आईची गळा दाबून हत्या करणाऱ्या मुलाला एपीएमसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ह्या आरोपीचे नाव रूपचाँद रेहमान शेख असून तो २१ वर्षाचा आहे. नवी मुंबईतील कोपरी गावात सलमा उर्फ जहानारा खातून रहेमान शेख आणि आरोपी रूपचांद शेख ह्या दोघांमध्ये कामावर जाण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून मुलगा रूपचांद याने आईचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले. या घटनेसंदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कोपरी गावातील गावदेवी मंदिराजवळील सागर भोईर इमारतीत आरोपी हा आई समवेत राहतो. सलमा घरकाम करून कुटुंब चालवत होती. मात्र तिचा मुलगा रुपचाँद हा काहीही काम करत नव्हता. त्यामुळे सलमा त्याला कामावर जाण्यासाठी तगादा लावत होती. त्याचे आणि त्याची सलमा उर्फ जहानारा खातून रहेमान शेख यांच्यात कायम वादावादी होत होती. रविवारी रात्री हि अशीच वादावादी सुरु असताना १.२० च्या सुमारास रूपचाँद शेख आणि आई यांच्यात कामावर जाण्याच्या कारणावरून भांडण झालेत्या भांडणाच्या रागातून रूपचाँद याने घरातील रुमालाने आईचा गळा दाबून तिला जीवे ठार मारले. याबबत माहिती मिळताच जवळच्याच इमारतीत राहणारी आरोपीची बहीण जास्मीनला घरी आली. तिने एपीएमसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.

0 9 5 0 6 5
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *