नाशिक : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या ४० पैकी गंभीर स्वरूपाच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला व सिन्नर यांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे.
रब्बी पेरण्या संथपणे
मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधील तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत. राज्यात यंदा पावसाचे प्रमाण एकूण सरासरीच्या १३.४ टक्क्यांनी घटले असून, रब्बी पेरण्याही संथपणे सुरू आहेत. आत्तापर्यंत १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती यावेळी कृषी विभागाने दिली.
गंभीर दुष्काळी तालुक्यांत उत्तर महाराष्ट्रातील पाच तालुक्यांचा समावेश
– नाशिक जिल्ह्यातील तालुके : Ḥमालेगाव, सिन्नर, येवला
– जळगाव : चाळीसगाव
– नंदुरबार : नंदुरबार
Users Today : 13