पत्नीसह आई-वडिलांना मारहाण, सततची भांडण, रागाच्या भरात बापाने असं काही केलं की सारंच संपलं

Khozmaster
1 Min Read

वाशिम: कारंजा तालुक्यातील मसला गावात दारू पिऊन सतत भांडण आणि पत्नीसह आई-वडिलांना मारहाण करून सतत त्रास देणाऱ्या ४५ वर्षीय मुलाचा बापानेच पहारीने वार करून खून केले आहे. ही घटना मंगळवारी (३१ ऑक्टोबर) रात्री घडली आहे. शरद आकाराम सोनोने असं खून झालेल्या ४५ वर्षीय मुलाचं नाव आहे. काहीच दिवसांपूर्वी याच कारणाने भांडण झाल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. तर मृताची एक १७ वर्षांची मुलगीही आहे.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास दारू पिऊन आल्यावर त्याने वडिलांसोबत भांडण केलं, तेव्हा रागाच्या भरात बापाने त्याच्या डोक्यावर पहारीने वार केला यात शरदचा जागीच मृत्यू झाला.दारूमुळे पुन्हा एक कुटुंब उध्वस्त झाले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री केली जाते. ती थांबविण्यासाठी महिलांनी वारंवार आंदोलन केले असून दारू विक्री मात्र बंद झाली नाही.दरम्यान, मृतकाचे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचं निधन झालंय, तर ९० वर्षीय आजी अजून जिवंत असून तिला पेन्शन लागू आहे. ही पेन्शन मिळवण्यासाठी शरद आजीलाही त्रास देत होता, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच धनज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी बापाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

0 9 5 0 6 2
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *