पुलाचा कठडा तोडून भरधाव कार ओढ्यात कोसळली, पाच जणांचा बुडून मृत्यू, चिमुकली बचावली

Khozmaster
1 Min Read

अहमदनगर : नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नेवासा फाटा येथे भीषण अपघात झाला. येथील घाडगे ओढ्यावरील पुलाचा कठडा तोडून एक कार पाण्यात पडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. तर एक चिमुकली बचावली आहे. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री ११च्या सुमारास घडली. हे सर्वजण छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये चालक, तीन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. अपघातात मृत पावलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांसह नेवासा फाटा परिसरातील नागरिकांनी बचावकार्यासाठी मदत केली.

नेमकं काय घडलं?

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पडलेल्या टायरला धडकून चारचाकी गाडी त्रिमूर्ती शाळेच्या ओढ्यात पलटी झाली. या अपघातात वसीम हारूण मुल्ला (वय ४१), अनसुरा बेगम हारुण मुल्ला (वय ४१), रेश्मा हलदार (वय ३५), हसीना बेगम हारुण पठाण (वय ५४), सामीया मोमीन हलदार (वय १४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मासुमा हलदार मोमीन हलदार (वय १३) ही मुलगी या अपघातातून बचावली आहे. संभाजीनगरचे हारूण अमीर मुल्ला यांनी नेवासा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०४ अ, २७९,४२७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 9 5 0 6 2
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *