बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव स्थानिक आदर्श नगरात आज ७ ऑक्टोबर २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. आदर्श नगरातील बंद असलेली ३ घरे फोडण्यात आली असून त्यामधून किंमती ऐवज लंपास केला असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच एएसपी अशोक थोरात, शहर पोस्टेचे ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगरातील रहिवासी संजीव रामराव पाटील (५२) हे काल ६ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास
सुमारास घराला कुलूप लावून कुटुंबासह परिसरातील नातेवाईकांकडे गेले होते. आज ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास संजीव पाटील कुटुंबियासह घरी आले असता त्यांना घराचे कुलूप आणि कडीकोंडा तुटलेला दिसुन आला. त्यांनी घराची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ७ हजार रोख व १९ हजार रुपयाचे सोन्याचांदीचे दागिने असा एकूण २६ हजाराचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे निदर्शनास आले.
तसेच अज्ञात चोरट्यांनी संजीव पाटील यांच्या घराशेजारी राहत असलेल्या विश्वासराव संपतराव बोराडे (७४) यांच्या बंद घराच्या मागील दरवाज्याचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या कपाटातील ५ हजार रूपये रोख लंपास केले. तर परिसरातील संदिप राऊत यांचेही घर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परंतु राऊत हे परगावी असल्याने किती मुद्देमाल चोरी गेला याची माहिती मिळू शकली नाही.
Users Today : 4