
*हिंम्मत दंदी राज्यस्तरीय क्रांतीयोद्धा पुरस्काराने सन्मानित*
प्रतिनिधी* विशाल गवई
उमेश दयाराम म्हसाये संस्थापित नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य तथा लिटल स्टार कॉन्व्हेन्ट, तेल्हारा द्वारा पुरस्कृत आणि दरवर्षी दिला जाणारा “राज्यस्तरीय क्रांतीयोद्धा पुरस्कार” हा पुरस्कार २०२३ साठी समाजसेवक तथा अकोट पोलिस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल हिंम्मत दौलतराव दंदी यांना प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार वितरणाचे आयोजन डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय तेल्हारा ह्या ठिकाणी दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी, डॉ.संतोष येवलीकर तहसीलदार तेल्हारा, उमेश दयाराम म्हसाये संस्थापक अध्यक्ष नवक्रांती शिक्षक संघटना, पद्मावती टीकार राजाध्यक्ष नवक्रांती शिक्षक संघटना, आणि डॉ.अभय पाटील प्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
सदर पुरस्कार हा शिक्षण, कला, आरोग्य आणि समाजसेवा ह्या क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
हिंम्मतराव दौलतराव दंदि हे अकोट पोलिस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल असुन आपल्या कार्याप्रती समर्पण म्हणून ते समाजकार्य सुद्धा करत असतात.अतिशय थोड्या काळामध्ये आपल्या समाजसेवेचा ठसा अकोट सहित राज्यभरात ठसवण्यात दंदी यांना यश प्राप्त झाले आहे. त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याचा सन्मान राज्यस्तरीय क्रांतीयोद्धा पुरस्काराने करण्यात आला.
Users Today : 4