मोरगाव भाकरे: अमरावती विभागामध्ये अकोला जिल्हा येथील एम.आय.टी.सी. राष्ट्रीय सरपंच संसद व जे.एस.डब्ल्यू ( JSW ) यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामविकास कार्यशाळा शिबीराचे आयोजन दिनांक रविवार 29 आक्टोंबर ते 31 आक्टोंबर 2023 रोजी रत्नागिरी येथे संपन्न झाले.या शिबिरामध्ये महेंद्रजी गाढवे अकोला जिल्हा राष्ट्रीय सरपंच संसद जिल्हा अध्यक्ष व एम.आय.टी.सी.राष्ट्रीय सरपंच संसद जिल्हा समन्वयक कंचनपुर येथील शिवशंकर पाटील डिक्कर प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर सि.आर फार्म कशा पद्धतीने, कोणती कामे केले जाते याबद्दल कार्यशाळाने तिन दिवसाचे शिबीर आयोजित केले होते व ते संपन्न झाले.या शिबिरामध्ये सि.आर.फंड ,बांबु लागवड,सौर उर्जा प्रकल्प, लघुउद्योग अशा वेगवेगळ्या योजना विषयक माहिती देण्यात आली. सदर प्रशिक्षणा करीता अकोला जिल्ह्या मधुन दोन ग्रामपंचायतीने सहभाग घेतला यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील धाकली आदर्श ग्रामपंचायत व अकोला तालुक्यातील कंचनपुर ग्राम पंचायत या दोन्ही आदर्श ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली
प्रतिनिधी अशोक भाकरे अकोला
खोज मास्टर न्यूज
Users Today : 4