अध्यात्मिक विचार भगवंताचे नामस्मरण जीवनात फलदायी ठरतात- वेदमूर्ती अविनाश जोशी

Khozmaster
2 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार (प्रतिनिधी) भौतिक सुखांमागे धावताना मनुष्य  अध्यात्माला विसरत आहे.भगवंतांचे नामस्मरण केल्यास आपले जीवन सार्थकी ठरते.कुटुंब उध्वस्त करणाऱ्या टीव्हीवरील मालिकां ऐवजी महिलांनी पौराणिक व धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन भागवत कथाकार वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले.
    शहरातील धुळे रस्त्यावरील गांधीनगर भागात श्रीमद  भागवत ज्ञानयज्ञ  सप्ताह सुरू आहे.याबाबत पुढे बोलताना अविनाश जोशी म्हणाले की, प्रत्येकाने दैनंदिन जीवनात अध्यात्मक विकास धरली पाहिजे.गर्भवती माता भगिनींनी घराघरांमध्ये भांडणे लावणाऱ्या सिरीयल पाहणे बंद करावे. त्याऐवजी सत्संग, आध्यात्म तसेच सदविचारि ग्रंथांचे वाचन करावे.अलीकडे  प्रत्येक कुटुंबात टीव्हीवरील मालिकांमुळे सासु सुनांची भांडणे वाढली आहेत. यावर मंथन होणे आवश्यक असल्याचे जोशी म्हणाले. शहरातील गांधीनगर परिसरात श्रीमद्भ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला असून कथा प्रवक्ता वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज कथेचे निरूपण करीत आहेत.
    या संगीतमय कथेत हार्मोनियमवर आनंद मराठे,तबला मुकेश पडोळे, बॅन्जो शिवम राठोड,तसेच पुरोहित विलास जोशी, राजेंद्र जोशी यांचे सहकार्य लाभले आहे. दररोज दुपारी 2 ते 5  या वेळेत प्लॉट नंबर 249, गांधीनगर ,हरिभाऊनगर महादेवमंदिरा जवळ,धुळे रोड,या ठिकाणी श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ  सप्ताहात आज  गुरुवार दि.2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा होईल.रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी कथेची सांगता होऊन दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण होईल. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजक शंकर मराठे,वामन मराठे आणि परिवारातर्फे करण्यात आले आहे.
फोटो कॅप्शन – नंदुरबार येथील धुळे रस्त्यावरील गांधीनगर भागात सुरू असलेल्या श्रीमद्भ भागवत ज्ञानयज्ञ कथेत निरूपण करताना वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज आणि समोर उपस्थित महिला भाविक.
0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *