पातूरच्या श्री रेणुका देवी संस्थानचे आता होणार वेब साईट चे माध्यमातून दर्शन

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी 

पातुर :- अकोला जिल्ह्यातील मानाचे व परिसरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवी संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे ही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. श्री रेणुका देवी संस्थान हे पंचक्रोशीत प्रसिद्ध असून भाविकांची मोठी गर्दी येथे पाहावयास मिळत असते .
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संस्थांनचे नवीन संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईटचे उद्घाटन संस्थान चे अध्यक्ष श्री शंकरराव नाभरे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. renukadevipatur.com वेबसाईटचे नाव आहे.
पातुर परिसराचा तसेच श्री रेणुका देवीचा खूप मोठा आणि प्रचलित असा इतिहास आहे तो इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा संस्थांची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी याच उद्देशाला समोर ठेवून शहरातील तीन वेबसाईट डेव्हलपर निकिता चंद्रकांत पाटील, वैष्णवी विवेक धरमकर आणि तेजस्विनी प्रकाश दांडगे ह्यांनी ही वेबसाईट संस्थांसाठी बनवून दिली आहे.आणि विशेष म्हणजे ही वेबसाईट त्यांनी एक सेवा म्हणून संस्थांनला बनवून दिली आहे. वेबसाईटवर श्री रेणुका देवी संस्थान ची सर्व माहिती, वार्षिक उत्सव, संस्थान चे जुने फोटो, आरती संग्रह आपल्याला पाहायला मिळणार आहे.ह्या तिघी पातुर मध्येच जॉब करत असून त्यासोबत वेबसाईट डेव्हलपरचे काम सुद्धा करतात. आणि त्याच कामातून त्यांनी एक उत्पन्नाचे साधन स्वतः तयार केले आहे. विशेष बाब म्हणजे आपल्यात असलेल्या कौशल्याचा वापर करून.गावातच राहून पैसे कमावता येतात हे त्यांनी सिद्ध केलं आहे. एवढ्या व्यस्त कामा मधून त्यांनी वेळ काढत ही वेबसाईट बनवलेली आहे. वेबसाईट बनवताना त्यांना संस्थांचे अध्यक्ष नाभारे साहेब तसेच पुजारी शशी अत्तरकार यांचे सहकार्य लाभले. वेबसाईट बनवण्याची प्रेरणा त्यांना कुठून आली असे विचारले असता त्यांनी सांगितले की आपल्याला येत असलेल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करणे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि एवढ्या मोठ्या संस्थांची वेबसाईट बनवण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्य आहे असे त्यांचे मत आहे.
आजच्या काळात माहिती तंत्रज्ञान हा विषय सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. संस्थांनची ही वेबसाईट अतिशय महत्वाची असून यामधून संस्थांच्या सर्व भाविकांना संस्थांचे नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील.
अकोला जिल्ह्यातील ही पहिली धार्मिक संस्थां आहे जीची वेबसाईट तयार करण्यात अली आसून तिची ऑनलाईन चे माध्यमातून महिती होणार आहे
मुलीच्या प्रयत्नांना यश निकिता चंद्रकांत पाटील (BBA), वैष्णवी विवेक धरमकर(BE) आणि तेजस्विनी प्रकाश दांडगे(BBA) या मुलींनी त्यांच्या कौशल्याच्या आधारे रेणुका देवीचे दर्शन ऑनलाईन व्हावे व राज्यातील लोकांना रेणुका देवीची महिती व्हावी या करीता या तिन मुलींनी अथक परिश्रम घेउन वेब साईट बनवली आहे
0 9 5 0 5 0
Users Today : 81
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *