प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर येथील जागृत श्री काशी – कवळेश्वर महादेवाचे मंदिर व श्री चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे या मंदिराकडे भाविक भक्तांना मंदिरात जाण्या येण्या करिता वहीवाटीचा रस्ता पातुर ते वाशिम महामार्गा वरुण तहसील कार्यालयाच्या दक्षिण बाजूने कवले यांच्या घरासमोरून व त्यांच्या शेतामधून पुढे नदीच्या मार्गाने कवळेश्वर मंदिरात व श्री चक्रधर स्वामी मंदीरात जातो.
आमच्या एकण्यात व निदर्शनास असे आले आहे की तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकामाला सुरुवात झालेली आहे. आमच्या नेहमीचा, वहिवाटीचा मंदिरात जाण्याकरिता भाविकांना आवश्यक असलेला रस्ता वाल कंपाऊंड बाधून बंद करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कामकाज सुध्दा सुरू आहे.
२४ १/११/०२३
साहेब, आम्ही सर्व कवळेश्वर मंदिरात जाणारे भक्त कवळेश्वर मंदिरावर जाण्या येण्या करिता ८० ते ९० वर्षापासून याच रस्त्याचा उपयोग करीत आहोत. आम्ही सर्व शिव भक्त याच रस्त्याचा आमच्या लहानपना पासून या वाहिवाटिचा वापर जाण्या येण्याकरिता करीत आहे तसेच आमचे वडील, आजोबा हे सुद्धा दुचाकी व चार चाकी वाहानाने याच रस्त्याचा वापर करीत कवळेश्वर मंदिरात जात येत होते व आम्ही सुद्धा जात येत आहोत.मोहदय, हा आम्हा भक्ताचा पूर्वापार चालत आलेला रस्ता आहे. , हक्काचा, सार्वजनिक घराकरिता व शेतात जाण्या येण्याकरिता रस्ता असणे जसे गरजेचे आहे. तसेच आपल्या आराध्याच्या मंदिरात जाण्या येण्या करिता वहिवाट रस्ता असणे आवश्यक आहे. धार्मिक कार्याकरिता मंदीरात जाण्याकरिता रस्ता असणे हा सर्व भाविकांचा धार्मिक अधिकार व हक्क आहे. आमच्या जीवनाची सुरुवात आमच्या आराध्य देवतेच्या पुजा अर्चनेने सुरू होते. आमचे आराध्य देवतेची पुजा करण्याकरिता सकाळी चार वाजता पासून ते रात्री बारा एक वाजेपर्यन्त आम्ही या कवळेश्वर मंदीरात जाने- येणे करतो आम्ही सर्व भक्त रात्री भजन कीर्तन, जागरण करतो. सर्व महाराष्ट्रातील भक्त मंडळी कावड घेवून महादेवाचा जलाभिषेक करण्याकरिता मंदीरात येतात.
शिव मंदीरात जाण्या येण्याचा पूर्वीपासून पिढ्यान पिढ्या चालत आलेला सार्वजनिक वहीवाटिचा रस्ता वॉल कंपाऊंड बांधून बंद केल्यास आमच्या धार्मिक मौलिक अधिकाराचे हनन होणार आहे. जसे अन्न , वस्त्र, निवारा ही मानवाची शारीरिक गरज आहे. त्याचप्रमाणे पुजा, धार्मिक विधी विधान हे मानसिक मन शांति करिता व आत्मोन्नती करिता गरजेचे आहे.
आम्हा भक्तांचा कवळेश्वर मंदीरात जाण्या येण्याचा सार्वजनिक रस्ता तहसील कार्यालयाचे वॉल कंपाऊंड बांधून बंद करण्यात येवू नये ही कडकडीची विनंती. तसे न झाल्यास आम्हाला आमरण उपोषणा शिवाय व जनआंदोलणा शिवाय पर्याय राहणार नाही
करिता तहसीलदार साहेब यांना विनंती की, आमचा सार्वजनिक रस्ता मोकळा ठेवून तहसीलदार साहेबानी व शासनानी शिव भक्तांना उपकृत करावे ही विनंती
ही वहिवाट कुण्या एका घराची शेताची किंवा व्यक्तीची नाही. ही वहिवाट सर्व महाराष्ट्रातील हजारो शिव भक्तांची तसेच श्री चक्रधर स्वामी यांच्या भक्तांची आहे. या प्रकरणात पक्षपात न करता आम्हाला न्याय देण्यात यावा. व आमचा श्री चक्रधर स्वामी मंदिर व जागृत कवळेश्वर महादेव मंदीरात जाण्याचा सार्वजनिक पिढीजात वहीवाटीचा आवश्यक असलेला रस्ता बंद करण्यात येवु नये ही विनंती. यावेळी सर्व भाविक भक्त मंडळी उपस्थित होते.
Users Today : 81