ग्रामीण रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यास १० हजारांची लाच घेताना अटक….

Khozmaster
2 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार -:ग्रामीण रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यास १० हजारांची लाच घेताना अटक.
     सविस्तर माहिती अशी की,नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात नंदुरबार आगारातील चालका कडून 10 हजाराची लाच स्विकारतांना सफाई व कर्मचारी वाहन चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात
पकडले आहे.
         तक्रारदार हे एस.टी.महामंडळ येथे चालक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराच्या प्रकृती कारणास्तव ते मे २०२३ पासून वैद्यकीय रजेवर आहेत. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांना नोकरीवर रुजू व्हावयाचे होते.
   यासाठी तक्रारदार यांना जिल्हा रुग्णालयातून ‘फिट फॉर ड्यूटी सर्टीफिकेट’ ची आवश्यकता होती.
  यासाठी तक्रारदार हे सदरचे प्रमाणपत्र घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेले असता तेथे नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात सफाईगार म्हणून कार्यरत असलेल्या जयेश शंकर तेजी याच्याशी त्यांची भेट झाली.
      यादरम्यान, जयेश तेजी यांनी तक्रारदारांना फोन वरुन व स्वत: जिल्हा रुग्णालय येथे लिपीक असल्याचे भासवून तसेच त्याचा साथीदार खासगी इसम हा डॉक्टर असल्याचे भासवून जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथून फिटनेस सर्टीफिकेट मिळवून देतो, असे सांगितले. त्या मोबदल्यात तक्रारदाराडून पैशांची मागणी केली.
   सुरुवातीला जयेश तेजी याने बारा हजार रुपयांची मागणी केली होती.
   तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले.
     त्यानुसार  तक्रारदाराकडून सदरची
रक्कम स्विकारत असतांना पंच
साक्षीदारांसमक्ष जयेश तेजी याला रंगेहात पकडण्यात आले.
नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस निरीक्षक समाधान वाघ,पोहेकॉ. विलास पाटील.ज्योती पाटील हवालदार अमोल मराठे, देवराम गावित, विजय ठाकरे, पोलीस नाईक संदीप नावाडेकर व मनोज अहिरे यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
   याबद्दल नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे – वालावलकर विभागाचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सापळा पथकाचे अभिनंदन केले.
0 9 5 0 5 0
Users Today : 81
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *