युवतींसाठी सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबीर शनिवारपासून स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम

Khozmaster
2 Min Read
नागपूर प्रतिनिधी अमित वानखडे – स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने ४ व ५ नोव्हेंबरला ९ ते २१ वर्षे वयोगटातील युवतींसाठी निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सीताबर्डी येथील सेवासदन हायस्कूलमध्ये हे शिबीर होईल.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. स्व. भानुताई गडकरी संस्था व कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपच्या ज्येष्ठ नेत्या स्व. रुपाताई रॉय यांच्या स्मरणार्थ युवतींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणात्मक उपाय म्हणून ९ ते २१ वयोगटातील युवतींसाठी निःशुल्क सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण शिबीर होणार आहे. शनिवारी (दि.४) व रविवारी (दि.५) सकाळी ९ ते ४ या कालावधीत सेवासदन हायस्कूल सक्षम सीताबर्डी याठिकाणी शिबीर होणार आहे. शिबिराचे उद्घाटन शनिवार दि. ४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कॅन्सर एड असोसिएशनच्या डॉ. नुपूर खरे, सेवासदन संस्थेच्या अध्यक्ष सौ. कांचनताई गडकरी, आमदार प्रवीण दटके, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, स्व. भानुताई गडकरी संस्थेचे पदाधिकारी श्री. निखिल गडकरी, श्री. सारंग गडकरी, श्री. अविनाश घुशे, श्री. श्रीकांत गडकरी, श्री. रमेश मानकर, डॉ. राजीव पोतदार, श्री. संजय टेकाडे, श्री. दिलीप धोटे तसेच शहर महामंत्री अश्विनी जिचकार, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी-वखरे आदींची प्रमुख उपस्थिती असेल. शिबिरात सहभागी होणाऱ्या युवतींचे सर्व्हायकल कॅन्सरच्या बाबतीत डॉक्टरांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येईल. बालरोगतज्ञ डॉ. गिरीश चरडे यांनी या शिबिराचे संयोजन केले असून शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीरंग वराडपांडे, सौ. वर्षा ठाकरे, डॉ. नूपुर खरे, डॉ प्रिया, डॉ. नाझिया, डॉ. अजय, डॉ. आनंद, डॉ. गजभिये आदींचे सहकार्य लाभत आहे. या शिबिरातील नोंदणीसाठी युवतींनी 8208171271 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
0 9 5 0 5 0
Users Today : 81
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *