मुंबई: मुंबई महापालिकेने ‘एन’ विभागातील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक एक व दोनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे एका कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही भागांच्या पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. कप्पा क्रमांक दोनचे काम २४ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. जलाशयाच्या दोन्ही कप्प्यांचे काम हे २० महिने (पावसाळा वगळता) सुरू राहणार आहे. सध्या या कालावधीमध्ये पाणीपुरवठा एका कप्प्यातून केला जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. जलाशयाच्या एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात असल्याने काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.पाणीपुरवठा झोन-नारायण नगर
आधीची पाणीपुरवठ्याची वेळ – दु ३.१५ ते सायं ०७.१५
पाणीपुरवठ्याची नवीन वेळ – दु २.३० ते सायं ०५.०० व रा १०.४५ ते रा. ११.३०विभाग
चिरागनगर, आझादनगर, गणेश मैदान, पारशीवाडी, नवीन माणिकलाल इस्टेट, एनएसएस मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एम. पथ, खलई गाव, किरोल गाव, विद्याविहार पश्चिम, हंसोटी गल्ली, खोत गल्ली, एमजी मार्ग, नौरोजी पथ, एच. आर. देसाई मार्ग, कामा पथ, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाल गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी
पाणीपुरवठा झोन – पंतनगर आउटलेट
आधीची पाणीपुरवठ्याची वेळ – सायं ०६.४५ ते रा ११.००
पाणीपुरवठ्याची नवीन वेळ – सायंकाळी ०६.१५ ते रात्री १०.३०
विभाग
भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राइम ब्रँच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, धृवराजसिंग मार्ग, सी. जी. एस. कॉलनी, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्ग, घाटकोपर, पश्चिमलगतचा परिसर, श्रेयस सिग्नल आदीपाणीपुरवठा झोन -सर्वोदय बूस्टिंग
आधीची पाणीपुरवठ्याची वेळ – सायं ०७.१५ ते रा ०९.१५
पाणीपुरवठ्याची नवीन वेळ -सायं ०७.१५ ते रा ०९.१५
विभाग
सेनिटोरीयम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. व्ही. मार्ग, गोपाल गल्ली, एल. बी. एस. मार्गलगतचा परिसर, घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर
Users Today : 81