गांजा शेतीवर पोलिसांची धडक कारवाई, झाडे उपटण्यासाठी मजूरांचा ताफा; बाजारात कोट्यवधींची किंमत

Khozmaster
1 Min Read

जालना: पारध (ता. भोकरदन) तालुक्यातील कल्याणी शिवारात गौसखान पठाण याच्या एक एकर शेतातील गांजाच्या शेतीवर पोलिसांनी कारवाई करून कोट्यवधी रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत. हजारोंच्या संख्येतील ही गांजाची मोठमोठी झाडे-झुडपे उपटण्याच्या कामासाठी पोलिसांनी खासगी मजुरांचा ताफा लावला आहे.

कठोरा बाजार येथील पठाण याच्या कल्याणी शिवारात एक एकर शेतामध्ये गांजाची झाडे लावून शेती केली जाते. मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात येथून गांजा पाठवला जातो. याच व्यवहारात असलेल्या दलालांच्या चर्चा या भागातील मोठ्या आर्थिक घडामोडी चालतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत गांजा पुरवणारे मोठे रॅकेट असल्याबाबत पोलिसांना संशय होता.मोठ्या पोलिस फौजफाट्यासह नायब तहसीलदार पप्पुलवाड, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन या शेतावर पोलिसांनी धाड टाकली. एका ट्रॅक्टरमधून बंदोबस्तात ही गांजा झाडे पारध पोलिस ठाण्यात नेण्यात येत आहेत. ही एकूण झाडे अंदाजे हजारोंच्या संख्येत असून, एका ओल्या झाडाचे वजन पाच ते साडेपाच किलो आहे.
पारध पोलिस ठाण्याचे सहपोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलिस उपनिरीक्षक विलास गुसिंगे, पोलिस उपनिरीक्षक विजय आहेर, नायब तहसीलदार पप्पुलवाड, तलाठी सोनूने, गणेश पायघन, कविता बारवाल, रुपाली नरवाडे, कृष्णा गवळी आदींच्या पथकाने कारवाई केली.

0 9 5 0 4 2
Users Today : 73
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *