जीवलग मित्र सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले, सेल्फी काढला, तलावात उतरले अन् घडलं भयंकर!

Khozmaster
1 Min Read

 यवतमाळ : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जीवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी वणी शहरापासून जवळ असलेल्या वांजरी येथे घडली. रविवारी सकाळी तिघांचेही मृतदेह मिळाले. आसिम अब्दुल सत्तार शेख (वय १६), नुमान शेख सादिक शेख (वय १६) दोघे रा. एकतानगर, वणी व प्रतीक संजय मडावी ( वय १६) रा. प्रगतीनगर, वणी अशी मृतांची नावे आहेत. तिघेही अकरावीत होते.सुट्टीच्या दिवशी दुचाकीने निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यास जाणे. मोबाइलने फोटो काढणे असा त्यांना छंद होता. शनिवारी तिघेही मोपेड क्र. एमएच २९ वाय ५३४२ने वणीजवळ असलेल्या वांजरी येथे गेले. पूर्वी या परिसरात चुनखडीच्या खाणी होत्या. त्यामुळे त्या जागेवर झालेल्या विस्तीर्ण खड्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. हा खड्डा ६० फूट खोल असल्याची माहिती त्यांना नव्हती. त्याठिकाणी सेल्फी काढल्यावर त्यांना पोहण्याचा मोह झाला.

0 9 5 0 4 1
Users Today : 72
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *