छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश

Khozmaster
1 Min Read

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी. समाजमाध्यामावरून अफवा थांबव्यात यासाठी आगामी ४८ तास ग्रामीण भागांत इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्ह्यात मनाई आदेशही जारी करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. पाचपेक्षा अधिक जास्त व्यक्ती जमण्यासाठी किंवा सभा, मिरवणूक, मोर्चा, ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण); तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना असतील.

मनाई आदेशाबाबत महत्त्वाचे

– इंटरनेट सेवा आगामी ४८ तास बंद.
– हे आदेश १५ नोव्हेंबरपर्यंत लागू असतील.
– या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे, विनापरवानगी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे.
– या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

0 9 5 0 4 1
Users Today : 72
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *