आरक्षणासाठी जीव देतोय, माझं बलिदान वाया जाऊन देऊ नका! नांदेडमध्ये मराठा तरुणानं आयुष्य संपवलं

Khozmaster
2 Min Read

नांदेड: राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असताना आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यात हा प्रकार घडला आहे. मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जीवाचे बलिदान देत आहे. माझे हे बलिदान वाया जाऊ नये. ‘एक मराठा लाख मराठा..’ अशी भावनिक चिठ्ठी लिहून एका २४ वर्षीय तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अर्धापूर हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. शुभम सदाशिव पवार ( रा.वडगाव. ता हदगाव) असं तरुणाचं नाव आहे. तामसा रोडवरील एका मंगल कार्यालय परिसरातील झाडीत त्याचा मृतदेह आढळून आला.शुभम पवार हा मागील काही महिन्यांपासून मुंबईमध्ये राहत होता. तिथे तो शिक्षण आणि प्लम्बरचं काम करत होता. शनिवारी तो दिवाळी सणासाठी मुंबईहुन नांदेडला परतला. नांदेडला आल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना फोन करुन नमस्कार चौक येथील बहिणीकडे जात आहे. फ्रेश होऊन गावाकडे येतो असं म्हणाला. मात्र, संध्याकाळपर्यंत तो गावाकडे परतला नाही. तो घरी न आल्याने कुटुंबियांनी मुलीला फोन करुन विचारणा केली. परंतु तो तिकडे आला नसल्याचे तिने सांगितले. नातेवाईकांनी फोन लावला असता त्याने देखील फोन उचलला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी तामसा पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी शुभमचे मोबाईल लोकेशन चेक केले असता तो अर्धापुर तामसा बायपास रोडवरील आर्यन बिअर बारचे जवळ असल्याचे समोर आले. पोलीसांसह नातेवाईक घटना स्थळी गेले असता शुभम हा नरहरी मंगलकार्यालयच्या बाजुला झाडीमध्ये मृत आढळुन आला. त्याच्या जवळ विषाचा डब्बा, पावती व चिठ्ठी आढळून आली.शुभमजवळ एक चिठ्ठी सापडली. यामध्ये म्हटले आहे की, ‘एक मराठा लाख मराठा मराठा’ आरक्षण भेटण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे. माझे हे बलिदान वाया जाऊ नये. मी शुभम सदाशिव पवार, असे चिठ्ठीत लिहले होते. दरम्यान, अर्धापुर पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील सरकारी दवाखाना येथे दाखल केला. काही दिवसांपूर्वी हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावातील एका उपोषणकर्त्या युवकाने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता पुन्हा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.

0 9 5 0 3 2
Users Today : 63
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *