उद्रेक पडतो बाहेर
दंगलीचा विस्पोट
कळेलं कुणा व्यथा
हातावर ज्यांचेपोट
जळे जनमालमत्ता
उठती आगीचेलोट
भस्मसात भविष्य
नुकसान होअलोट
नंतर कडक सर्वत्र
बंदोबस्त कडे कोट
जळले तया कळले
का झाला कडेलोट
रोजगार पडला बंद
बंदिस्त तक्रार ओठ
आधीचा धंदा मंदा
आलेली मोठी खोट
सतत बिघडत जाई
कशीबांधायची मोट
कसे बसे जगतात
सामान्य सरळ सोट
गुन्हे माघार होतात
मनात कुणाचे खोट
जरी जग पडले बंद
चाळते पळते नोट
कळत नाही कधीचं
कुणाचे हाती रिमोट
आग लावणारे गेले
मागे उरे धुराचे लोट
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
सर नमस्कार
कविता प्रस्तुत कृपया प्रकाशित करावीं ही विनंती 

|
ReplyForward
|
Users Today : 60