केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम ५ नोव्हेंबरला

Khozmaster
1 Min Read
नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मा. मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा कार्यक्रम होईल. मा. मंत्री महोदय नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपात (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मा. मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 9 5 0 2 9
Users Today : 60
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *