सरकार विरोधात संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचा रास्ता रोको… सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळन्याचा प्रयत्न, पोलीसांनी घेतला ताब्यात…

Khozmaster
1 Min Read
शिवानंद पवार प्रतिनिधी
मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंदवन्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात निषेध नोंदवन्यासाठी मेहकर शहरातील जिजाऊ चौक या ठिकाणी रास्ता रोको करत निषेध नोंदवन्यात आला… ह्यावेळे जिजाऊ ब्रिगेडच्या महीलांच्या वतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करन्यात आली… सरकारने आरक्षणाबाबत वेळकाढु भुमिका न घेता त्वरित ह्यावर तोडगा काढावा… व मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंदवन्याचा सरकार निर्णय तात्काळ मागे घ्यावा… अन्यथा सरकारच्या वेळकाढु भुमिकेमुळे ज्या मराठा बांधवांनी नैराश्यातुन आत्महत्या केल्यात त्यांच्या हत्येचे गुन्हे सरकारवर का नोंदवु नये असा सवाल करन्यात ह्यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या वतीने उपस्थित करन्यात आला… तसेच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्यां कडुन सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळन्याचा प्रयत्न करन्यात आला परंतु पोलीसांनी तात्काळ सदर पुतळा ताब्यात घेतला…प्रसंगी मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करन्यात आली… ह्यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष पांडुरंग पाटील, तालुकाध्यक्ष धनंजय बुरकुल,ता.सचिव जगदीश एखंडे, कार्यकारिणी सदस्य गजानन पवार, गजानन लोंढे, गोपाल गरड, गजानन चेके, गोपाल गवळी, पंजाब पवार,जनार्धन तोंडे, सोपान जाधव,शाम काकडे,अविनाश देशमुख तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता देशमुख, अर्चना बोरे,निता काळे,अंजली देशमुख, दुर्गा ठोकळ, लक्ष्मी जोशी, सुनिता देशमुख, अर्चना गोरे, कल्पना निकस, अश्विनी देशमुख, चेके ताई,शिंदे काकु आदींसह शेकडो समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.
0 9 5 0 2 9
Users Today : 60
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *