प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधी) योग गुरु रामदेव बाबा संचलित पतंजली योग समितीच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे जयचंदनगर येथे सुरू असलेल्या योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
कोरीटनाक्या जवळील जयचंद नगर परिसरात दररोज सकाळी पाच ते सात या वेळेत योगासन शिबिर सुरू आहे.
या शिबिरात पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी एन.डी. माळी, जिल्हा संघटन प्रमुख ज्येष्ठ
योग शिक्षक वसंत पाटील, भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारीनवनीत शिंदे, तालुका प्रभारी भाऊसाहेब गिरासे, भास्कर रामोळे, साधकांना मार्गदर्शन करीत आहेत.
दरम्यान रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी शिबीराचा समारोप होईल.परिसरातील साधकांनीयोग शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार पतंजली योग समितीतर्फे करण्यात आले आहे.
Users Today : 44