मंठ्यात सरकारची गध्यावरून धिंड

Khozmaster
1 Min Read
(पाटोदा व खोरवड सावंगी सर्कल येथील सकल मराठा समाजाचा रस्ता रोखो )
मंठा शहरामध्ये आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थनार्थ व आरक्षण मिळावे यासाठी गद्यावरून प्रशासनाची दिंड तसेच याबरोबर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे या उपोषणास पाठिंबा म्हणून मंठा तालुक्यातील पाटोदा गावापासून दीडशे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा मंठा शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात आणून रास्ता रोको करण्यात आला यावेळी सरकार विरोधात रोष व्यक्त करून ९५ मराठा बांधवा मुंडन करण्यात आले व भजन गात आरक्षण देण्याविषयी घोषणा देण्यात आल्या खोराड सावंगी सर्कल मधील गावांच्या वतीने मंठा शहरातील संत तुकाराम महाराज नगर मध्ये साखळी उपोषण सुरू आहे यादरम्यान तेथील उपोषणकर्त्यांनी १५१मराठा बांधवांनी मुंडणकरून सरकारचा निषेध केला व गाढवावरून सरकारवरचा रोष व्यक्त करत दिंड काढण्यात आली संत तुकाराम महाराज येथून गाढवावर सरकारची प्रतिमा ठेवून शहरातील विविध मार्गातून धिंड काढून मंठा शहरातील छत्रपती चौकात आरक्षणाविषयी घोषणा देत ठिय्या आंदोलन करून मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत तीन तास हे आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस उपाधीक्षक सुरेश बुधवंत पोलीस निरीक्षक एम. बी.खेडकर यांच्या पथकाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.
0 9 5 0 1 3
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *