प्रविण चव्हाण
नंदुरबार -: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ केंद्र सरकारने 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून देशभरात साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचे तात्काळ पालन करत शिक्षण विभागाने राज्यभरातील शाळांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार जयंती निमित्त शाळांमध्ये विविध
कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार मिशन प्राथ. शाळा, इसाईनगर ता. नंदूरबार येथील शाळेत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. आर. गोसावी होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी भटू पवार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर माहिती दिली.
तसेच पियूष वळवी. सुसंना वळवी या विद्यार्थ्यानी हि भाषणे दिली. व सर्वांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
Users Today : 44