मेहकर येथील सावजी गल्लीतील रेणुका माता मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त ३१ आॕक्टोबरला महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
नरसिंह संस्थानचे विश्वस्त गोपाल महाराज पितळे, राजुभाऊ राऊत, नितीन धावटेकर, विनोद राऊत या मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महिला व पुरुषांनी वेगवेगळी रांग लावून शिस्तबद्ध रीतीने महाप्रसादाचा लाभ घेतला. नवरात्र उत्सवानिमित्त रेणुका माता मंदिरामध्ये दहा दिवस अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत राजेश अगस्ती यांच्याहस्ते सकाळी पूजा – अभिषेक, सकाळची आरती, संध्याकाळची आरती आदी कार्यक्रम झाले. याशिवाय देवीच्या जागरण गोंधळाचाही कार्यक्रम उत्साहात पार पडला. नवरात्र काळात दररोज संध्याकाळी शेकडो लोक आरतीला उपस्थिती दर्शवित होते. तर दररोज दर्शनासाठी भाविकांची रीघ लागत होती. नवरात्र उत्सवाच्या आणि महाप्रसादाच्या यशस्वीतेसाठी महाप्रसाद समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 44