विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार

Khozmaster
2 Min Read
अकोला प्रति- एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस कमी होत असतानाच दुसरीकडे मात्र शासकीय अनुदान मिळत नसतानाही अंदुरा येथील वरिष्ठ प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षिका स्वखर्चाने भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सोयी निर्माण करीत असल्याने शिक्षणाचा दर्जा वाढत आहे; परिणामी पटसंख्येचा आलेखही उंचावत आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणांसाठी त्या मिळून प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार केंद्र सुरू करण्यात आले. शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी पात्र व्हावेत, यासाठी जादा वर्ग घेण्यात येतात.
या शिक्षकांनी एकदा तर खोली बांधकामासाठी बँकेचे कर्जही काढले होते. पदरमोड करून गरजू, होतकरु विद्यार्थी-विद्यार्थ विनींच्या शिक्षणाची वाट प्रकाशयमय करणाऱ्या मुख्याध्यापिका सुनंदा डांगे, शिक्षिका अनिता सांगोळे, रेखा ढंगारे, अनिता पाटील, रुख्मिणी खंडारे या महापुरुषांच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीतून आचारण करीत आहेत…
आतापर्यंत आवार भिंत – १ लाख ३५ हजार, बोअर – २८ हजार, शौचालय – ३५ हजार, पाण्याची टाकी – २० हजार खर्च केला आहे. तसेच १ लाख ४० हजार रुपये खर्च करून दोन खोल्याही बांधल्या. बांधकामासाठी बँकेतून मुख्याध्यापिका सुनंदा डांगे यांच्या नावे कर्ज काढण्यात आले. हे कर्ज सामुहिकपणे फेडण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच वर्ग खोल्यांची शिक्षिकांनी रंगरंगोटी केली.
शाळेत वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा, क्रीडा, अन्य उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जातात.
ग्रामीण भागात असलेल्या शाळेतील परिसराची पुर्णपणे स्वच्छता केलेली,शाळेतिल लहान चिमुकल्या मुलांना अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने वागणूक,शाळेतील प्रत्येक वर्गखोलीत भिंतीवर फक्त आणी फक्त गणितातील पाढे, सुविचार, असे अतिशय सुंदर असे लिखाण केलेले आहे.
सावित्रीच्या लेकींच्या शैक्षणिक भविष्यासाठी कार्य करणाऱ्या अंदुरा येथील विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षिका यांच्या कार्याची दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षिका यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी अंदुरा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ विद्या मंदिर येथे जाऊन सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे, वंचित बहुजन आघाडी चे युवा कार्यकर्ता सुमित तेलगोटे, मुख्याध्यापिका सुनंदा डांगे, शिक्षिका अनिता सांगोळे, रेखा ढंगारे, अनिता पाटील, रुख्मिणी खंडारे, शिक्षक सुरेश भगत, रामेश्वर डाबेराव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 9 5 0 1 3
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *