सतिश मवाळ
मेहकर लोणार शहरातील बनमेरू कॉलेज मीटिंग हॉल मध्ये आयोजित भाजपा पक्षाच्या महत्वाच्या बैठकी दरम्यान भाजपा माजी आमदार तथा लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे व बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.गणेशदादा मांटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच लोणार तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे समक्ष उद्धव आटोळे यांनी भाजपा पक्षाच्या पक्ष वाढीसाठी घेतलेली मेहनत व त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी उद्धव आटोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
२००९ पासून भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण करून युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष,जिल्हा सचिव युवा मोर्चा,तालुकाध्यक्ष तालुका संयोजक सोशल मीडिया सेल असे भारतीय जनता पार्टी मध्ये पद भूषवत पक्षाच्या प्रचार आणि प्रसार करत पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे पक्षाच्या विचारासी एकनिष्ठ राहून एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची तयारी असतांना भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हाध्यक्ष महेश दादा मांटे यांनी वरिष्ठांच्या अनुमतीने उद्धव आटोळे यांची भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष म्हणून एका आदेशान्वये नियुक्ती केली आहे..
भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सोशल मिडिया पदी उद्धव आटोळे यांची नियुक्ती झाल्याने तालुक्यासह जिल्हात त्यांच्या चाहत्यांनी त्याचप्रमाणे लोणार भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव सानप,शिवाजी सानप,गजानन मापारी, प्रकाश महाराज मुंडे, मारोतराव सुरुशे, सुबोध संचेती,शेख जावेद,राम मापारी,सुरेश अंभोरे,संजय बुरकुल,गणेश तांगडे,संजय दहातोंडे, सचिन डहाळके यांच्यासह तालुक्यातील सर्वच भाजपा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्धव आटोळे यांना सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष भाजपा बुलढाणा पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश दादा मांन्टे यांनी दिलेल्या जबाबदारी बद्दल आभार व्यक्त करत,”पक्षाने माझ्यावर जिल्हा सोशल मीडिया च्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली आहे.पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ग्रामीण व शहरी भागात सर्वांना सोबत घेऊन काम करणार आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप पक्ष ला भरघोस यश मिळवण्यासाठी प्रयत्न करीन “
-उध्दव माधवराव आटोळे
Users Today : 44