बसस्थानकात एसटी लावून झोपायला गेले, पहाटेच्या सुमारास चालकाचा विश्रामगृहात मृतदेह; हिंगोलीत खळबळ

Khozmaster
2 Min Read

हिंगोली : हिंगोलीच्या आगारात चालकासाठी असलेल्या विश्रामगृहात एका बस चालकाचा मृतदेह आढळला आहे. सुरेश सलामे (वय ५५) असं चालकाचं नाव आहे. ते विश्रामगृहात झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.

सलामे हे मध्यरात्रीच्या सुमारास लातूरवरून हिंगोलीला बस घेऊन आले होते. प्रवासी उतरून हिंगोली आगारामध्ये त्यांनी बस उभी केली आणि बसस्थानकातील शासकीय विश्रामगृहामध्ये विश्रांतीसाठी गेले होते. इथेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आगार व्यवस्थापनाने दिली आहे.आगाराच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सलामे मागील २५ वर्षांपासून हिंगोलीच्या आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील असून मागील काही दिवसापासून हिंगोली येथेच राहायचे. काल गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लातूरवरून हिंगोली बस घेऊन ते निघाले. ‌रात्री प्रवाशांना हिंगोलीच्या बस स्थानकात सोडल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते जुन्या बस स्थानकाच्या कर्मचारी कक्षामध्ये आरामासाठी गेले.विश्रामगृहात झोपले असताना रात्री कोणतीही बस येत नसल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही कर्मचारी गेला नाही. आज सकाळी काही कर्मचारी कामाच्या निमित्ताने कक्षामध्ये गेले असता त्या ठिकाणी चालक सलामे हे मरण पावले असल्याचे आढळून आले. आगार प्रमुखांना माहिती मिळाल्यानंतर आगारप्रमुख सुर्यकांत थोरबोले, कर्मचारी मुकेश ठोंबरे, वाहतूक नियंत्रक एफ.एम शेख, त्यांच्यासह पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी चालक सलामे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केला असून मृत्यूचे कारण उत्तरीय तपासणीनंतर समोर येईल यामध्ये घटनेचा अधिक तपास शहर पोलिसांकडून सुरू आहे.

0 9 5 0 0 6
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *