ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला जादुटोण्यामुळं गालबोट, कुठं घडला धक्कादायक प्रकार? जाणून घ्या

Khozmaster
2 Min Read

सांगली : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सांगली जिल्ह्यातील ८० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतदानासाठी एकच दिवस राहिल्याने गावांमधील प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज सायंकाळी प्रचाराची सांगता होणार असल्याने उमेदवारांची धावपळ सुरु आहे. मात्र, दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार हरिपूर गावात घडलाय. गावाच्या वेशीवर जादूटोणा आणि भानमतीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. रस्त्याच्या कडेला आणि कमानी जवळ लिंबू, हळदकुंकू, टाचण्या टोचलेली बाहुली गावकऱ्यांच्या निदर्शनास आली. या प्रकारानंतर गावातील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत.
जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली होती. १३ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले. तर 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ८० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी २१८ तर सदस्य पदांसाठी ६६४ जागांसाठी १ हजार 505 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी रोजी मतदान होणार असल्याने गावागावात धुमशान सुरु आहे.

सांगली शहरानजीक असणाऱ्या हरिपूर गावामध्ये मात्र अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार निवडणुकीमध्ये पुढे आला आहे. हरिपूर गावाच्या वेशीवर गावची कमान असणाऱ्या ठिकाणी भानामती आणि जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीच्या सुमारास लिंबू हळद-कुंकू टाचण्या टोचलेली बाहुली यांसह जादूटोण्याचे साहित्य कमानीच्या पायाशी ठेवल्याचे आज सकाळी काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यानंतर गावामध्ये मोठी खळबळ उडाली.विरोधक आणि सत्ताधारी यांनी मात्र जादूटोणा केल्याने कोणाची सत्ता येत नाही अथवा जात नाही उलट लोक काम बघून मतदान करतात असे आरोप करत आहेत. सदरचा प्रकाश निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी जादूटोणासाठी ठेवलेले साहित्य हे पेटवून टाकले. एकीकडे स्मार्ट जमान्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या प्रकारांमुळे चांगली चर्चा रंगली होती.दरम्यान, विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपेक्षा अधिक चुरशीनं ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या जातात. सांगलीतील हरिपूरमध्ये जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

0 9 5 0 0 1
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *