भरधाव पिकअपची दुचाकीला धडक, मामा-भाचे अन् मित्र हवेत उडून गाडीखाली चिरडले; जागीच ठार

Khozmaster
1 Min Read

वाशिम : राज्यात रस्ते अपघाताच्या घटना वारंवार समोर येत असून आता वाशिम जिल्ह्यामध्येही एक भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. वाशिम जिल्ह्यातील महत्वाचा मार्ग असलेल्या वाशिम रिसोड महामार्गावर आज सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात ३ जण जागीच ठार झाले आहेत. या रिसोड मार्गावरील नागठाना गावाजवळ असलेल्या वळणावर रिसोडवरून वाशिमच्या दिशेने जाणारी बोलेरो पिकअप अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या दुचाकीवर धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे.या अपघातामध्ये येवती ता. रिसोड इथल्या आकाश जाधव वय १७ वर्ष, दिनकर गायकवाड, वय २६ वर्ष आणि गणेश शिंदे वय १८ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे तर एकलासपूर ता. रिसोड येथील गोपाल कुलाळ हा बोलेरो पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे.या अपघातामध्ये येवती ता. रिसोड इथल्या आकाश जाधव वय १७ वर्ष, दिनकर गायकवाड, वय २६ वर्ष आणि गणेश शिंदे वय १८ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे तर एकलासपूर ता. रिसोड येथील गोपाल कुलाळ हा बोलेरो पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा झाला आणि त्यावरील तिघेही फरफटत जाऊन एकजण पलटी झालेल्या पिकपखाली दबला गेला तर दोनजण रस्त्यावर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलिसांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. एकाच गावातील तिघेजण मृत्युमुखी पडल्याने येवती गावावर शोककळा पसरली आहे.

0 9 5 0 0 1
Users Today : 32
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *